Maharashtra Weather Update : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघ्या काही तासांचा काळ बाकी आहे. 31st सेलिब्रेट करून सरत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे आणि नवीन वर्षाचे स्वागत होणार आहे. यानंतर नवीन वर्ष सुरू होईल. मात्र येत्या नवीन वर्षाची सुरुवात ही पावसाने होणार असा अंदाज आहे.
खरतर गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये हिवाळ्यात पावसाळा अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील गेल्या महिन्यात अशीच परिस्थिती होती. विशेष बाब म्हणजे या चालू महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच झाली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामातील शेती पिके अक्षरशः भुईसपाट झालीत. परिणामी, शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे गेलेले नाही. महाराष्ट्रावर अजूनही अवकाळी पावसाचे सावट कायमच आहे.
सध्या राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गारठा वाढलेला आहे. पण आता उत्तरेकडील राज्यांमध्ये किमान तापमान वाढत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे.
तसेच राज्यात दक्षिणेकडे राज्यांमधून बाष्पयुक्त वारे येत आहेत. याचा परिणाम म्हणून आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसात किमान तापमानात दोन ते तीन अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे.
यामुळे राज्यातील गारठा देखील कमी होणार आहे. अशातच आता महाराष्ट्रात या चालू वर्षाच्या सरते शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज समोर आला आहे.
आगामी तीन ते चार दिवस महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे.
तामिळनाडूमध्ये तर मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे त्या ठिकाणी सामान्य जनजीवन देखील विस्कळीत झाले होते. आता तिथे पावसाची तीव्रता कमी झाली आहे मात्र तरीही हलका पाऊस सुरूच आहे.
आता पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्र आणि राजस्थान मध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे सांगितले जात आहे. यासोबतच 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 पर्यंत तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तसेच आज आणि उद्या जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज IMD ने दिला आहे.