अबब ! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे चक्क 100 कोटींच झाड ; झाडाला असते 24 तास सुरक्षा, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Viral News : जगात अशा काही गोष्टी असतात ज्यावर सहजासहजी विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते. जगात अशा काही आश्चर्यकारक गोष्टी असतात ज्या उघड्या काणाने ऐकून किंवा उघड्या डोळ्याने पाहून देखील विश्वास ठेवणे अशक्य होते.

अशीच एक गोष्ट आपल्या महाराष्ट्रातून समोर आली आहे ज्यावर उघड्या डोळ्यांनी पाहून आणि उघड्या कानांनी ऐकूनही विश्वास ठेवणे थोडे मुश्कील आहे. जर आम्ही तुम्हाला असं सांगितलं की आपल्या महाराष्ट्रात असे एक ठिकाण आहे जिथे चक्क 100 कोटी रुपये किमतीचे एक झाड आहे, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.

मात्र हे खर आहे. आपल स्वर्गाहुन सुंदर ते कोकण यां झाडाची साक्ष देत आहे. कोकणात हे शंभर कोटींचं झाड मोठ्या थाटात उभ आहे. विशेष म्हणजे दीड शतकापासून अर्थातच 150 वर्षांपासून हे झाड कोकणात आहे.कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेल्या मौजे चाफवली येथील देवराई मध्ये हे झाड दीडशे वर्षांपासून डोलत आहे.

विशेष म्हणजे या शंभर कोटीच्या झाडाच्या सुरक्षेसाठी येथील गावकरी आणि वनविभाग 24 तास दक्ष असतो. या झाडाची हानी होऊ नये, या झाडाची चोरी होऊ नये यासाठी 24 तास वनविभागाच्या आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून या झाडाला सुरक्षा दिली जात आहे.

आता तुमच्या मनात निश्चितच असा प्रश्न आला असेल की हे झाड नेमके आहे तरी कशाचे? चला तर मग जाणून घेऊया नेमके हे झाड आहे तरी कशाचे आणि ते आपल्या स्वर्गाहुन सुंदर कोकणात आले तरी कसे ?

कशाचे आहे हे झाड

मीडिया रिपोर्ट नुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावच्या देवराईत दीडशे वर्षांपासून उभे असलेले हे झाड रक्तचंदनाचे असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे हे झाड जवळपास 100 कोटी रुपये किमतीचे आहे असा दावा केला जात आहे.

आता असा प्रश्न पडतो की, रक्तचंदन आपल्या महाराष्ट्रात तर आढळत नाही. मग हे कोकणात आलं तरी कसं. हे रक्तचंदनाचे झाड तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये आढळते. विशेष म्हणजे तमिळनाडू मधल्या काही विशिष्ट भागातच हे झाड आढळत.

रक्तचंदन एक औषधी वनस्पती आहे. याला आंतरराष्ट्रीय बाजारात खूपच महत्त्व आहे. याची किंमत बाजारात पाच ते सहा हजार रुपये प्रति किलो एवढी विक्रमी असल्याचा दावा होतो. चीनमध्ये याला मोठी मागणी आहे. आयुर्वेदिक औषध, मूर्तींसाठी या चंदनाचा वापर होतो.

या झाडात असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. असं सांगितलं जातं की, कोकणात हे झाड एकतर इंग्रजांच्या काळात लावलं गेलं असावं किंवा मग पक्षाच्या विष्ठमार्फत हे कोकणातील जंगलात उगले आणि मग वाढलं असावं. खरे तर, यां झाडाला अनेकदा तोडण्याचा प्रयत्न झाला.

मात्र हे झाड औषधी आणि दुर्मिळ असल्याचे समजताच गावकऱ्यांनी एकमुखाने झाडाला तोडायचे नाही असा निर्णय घेतला आहे. या झाडाची सर्वदूर ख्याती पसरल्यानंतर झाड चोरण्यासाठी खूपच प्रयत्न झालेत यामुळे पोलीस, गावकरी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून या झाडाला चोवीस तास सुरक्षा दिली जाऊ लागली. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा