Maharashtra Vihir Anudan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी देखील अनेक योजना सुरू आहेत. दरम्यान आज आपण राज्य शासनाकडून सुरू असलेल्या अशाच एका शेतकरी हिताच्या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवल्या जात असलेल्या विहीर व फळबाग योजने संदर्भात माहिती पाहणार आहोत. खरे तर, शेतीमध्ये शाश्वत पाण्याची उपलब्धता आवश्यक असते. जर चांगले पाणी असेल तर शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता येते.
यामुळे पाण्यासाठी शेतकरी बांधव विहीर खोदत असतात. मात्र विहीर खोदण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. आता प्रत्येकच शेतकऱ्याकडे एवढा पैसा नसतो. यामुळे शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी शासनाकडून अनुदान पुरवले जात आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत हे अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान आज आपण या विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतात याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ऑनलाइन अर्ज करता येणार
सुरुवातीला विहीर अनुदान योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागत असे. शेतकऱ्यांना संबंधित पंचायत समितीमध्ये जाऊन यासाठी अर्ज करावा लागत असे. आता मात्र ऑफलाइन पद्धत जुनी झाली आहे.
आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी एक नवीन ॲप्लिकेशन देखील तयार झाले आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना ॲप्लिकेशनच्या मदतीने अर्ज करता येणार आहे.
या ॲप्लिकेशनवरून करता येणार अर्ज
विहीर अनुदान योजनेसाठी इजीएस हॉर्टी या ॲप्लिकेशनवरून शेतकऱ्यांना अर्ज सादर करता येत आहे. फळबाग लागवडीसाठी आणि विहीर अनुदानासाठी या ॲप्लिकेशनवरून ऑनलाईन अर्ज करता येतो. तसेच अर्जाची स्थिती देखील ॲप्लिकेशन वर तपासता येते.
ॲप्लिकेशन मध्ये यासाठी स्वातंत्र व्यवस्था उपलब्ध आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर विहिरीसाठी आणि फळबागेसाठी अर्ज या कॉलम मध्ये इच्छुक शेतकऱ्यांना यासाठी अर्ज करता येतो. येथे अर्ज करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे.
कोण-कोणती कागदपत्रे लागतात ?
इजीएस हॉर्टी ॲप्लिकेशनवर विहीर आणि फळबागेसाठी अर्ज करताना अर्जदार शेतकऱ्याला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड, ८ अ उतारा, तसेच ज्या ठिकाणी विहीर बांधकाम करणार आहे त्या ठिकाणचा सातबारा उतारा, मोबाईल क्रमांक, बँक खाते पासबुक इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात.