Maharashtra Vande Sadharan Train : भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसच्या धरतीवर वंदे साधारण ट्रेन चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर ही नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. वास्तविक 2019 मध्ये सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस अल्पावधीतच प्रवाशांमध्ये लोकप्रिय बनली आहे.
ही गाडी सध्या स्थितीला देशातील 34 महत्त्वाचा मार्गावर सुरू आहे. विशेष बाब अशी की मार्च 2024 पर्यंत ही गाडी देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर चालवण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
परंतु या गाडीचे तिकीट दर हे देशातील राजधानी आणि शताब्दी यांसारख्या एक्सप्रेस गाडीच्या तुलनेत खूपच अधिक आहेत. यामुळे ही गाडी सर्वसामान्यांसाठी सुरू झाली नसल्याचा आरोप केला जातो.
या गाडीचा सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना अजिबात फायदा होत नाहीये. ही गाडी फक्त श्रीमंतांसाठी सुरू झाली आहे असा आरोप रेल्वे वर केला जात आहे. हेच कारण आहे की रेल्वेने सर्वसामान्यांसाठी नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे.
वंदे साधारण ट्रेन ही वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर सुरू केली जाणार आहे. ही एक नॉन एसी ट्रेन राहणार आहे. या गाडीचा कमाल वेग 130 किलोमीटर प्रति तास एवढा राहणार आहे.
मात्र या गाडीचे तिकीट दर हे वंदे भारत एक्सप्रेसच्या तुलनेत कमी राहणार आहे. दरम्यान या वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेन बाबत एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ही वंदे साधारण एक्सप्रेस आता लवकरच सुरू होणार आहे.
विशेष बाब म्हणजे ही गाडी मुंबईवरून चालवली जाणार आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान ही गाडी सुरू होऊ शकते असे वृत्त समोर आले आहे. या गाडीचे ट्रायल रन देखील सुरू झाले आहेत.
मंगळवारी अहमदाबाद ते मुंबई दरम्यान या ट्रेनची तांत्रिक चाचणी घेण्यात आली आहे. अहमदाबादहून मुंबई सेंट्रलला पोहोचण्यासाठी ट्रेनला सुमारे 6 तास 30 मिनिटे लागली आहेत.
दरम्यान आज अर्थातच आठ नोव्हेंबर 2023 रोजी या ट्रेनची स्पीड ट्रायल होणार आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान ताशी 130 किमी वेगाने धावणार आहे.
ही ट्रेन मुंबई सेंट्रल येथून सकाळी 6.40 वाजता सुटणार आहे आणि सुरतमार्गे अहमदाबादला पोहोचणार आहे. या गाडीमुळे सर्वसामान्यांचा मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास गतिमान होणार आहे.