राज्यातील शेतकऱ्यांना आता 10 गुंठे जमीनही खरेदी-विक्री करता येणार ! पण ‘या’ भागातील जमिनीसाठी नवीन निर्णय लागू राहणार नाही, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Tukadebandi Kayda : राज्य शासनाने तुकडेबंदी कायद्याबाबत नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार असल्याचे मत जाणकार लोकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे. राज्य शासनाने तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणली असून आता शेतीसाठी निश्चित करण्यात आलेले प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आले आहे.

यामुळे आता तुकडे बंदी कायदे अंतर्गत कमी क्षेत्र असलेल्या तुकड्यातील जमिनींचे देखील खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहेत. खरंतर याआधी तुकडेबंदी कायदे अंतर्गत प्रमाणभूत क्षेत्र तालुक्यानुसार बदलत होते, पण आता संपूर्ण राज्यात हे प्रमाणभूत क्षेत्र एकसमान राहणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, याआधी तुकडे बंदी कायदे अंतर्गत किमान 40 गुंठे जिरायती जमीन खरेदी-विक्री करता येत असे.

तसेच किमान 11 गुंठे बागायती जमीनीची खरेदी विक्री होत असे. मात्र आता राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार वीस गुंठे जिरायत जमीन आणि दहा गुंठे बागायती जमीन असली तरी देखील खरेदी विक्री करता येणार आहे. आठ ऑगस्ट 2023 रोजी राज्य शासनाने हा निर्णय घेतला असून याची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

तुकडे बंदी कायद्यातुन शासनाने सवलत दिली आहे मात्र हा निर्णय फक्त आणि फक्त ग्रामीण भागातील जमिनीच्या बाबतील झाला असून महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील जमिनीसाठी शासनाने घेतलेला हा निर्णय लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खरंतर राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आहे. यानुसार जमिनीचे तुकडे पाडून विक्री करण्यास प्रतिबंध आहे.

पण सदर कायदा अस्तित्वात असताना देखील अनेक भागात जमिनीचे तुकडे पाडून दस्त नोंदणी करण्यात आल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी किमान प्रमाणभूत क्षेत्रात बदल करण्याचा निर्णय घेत तुकडे बंदी कायद्यातून सूट देण्याचे जाहीर केले आहे. पण ही सूट केवळ आणि केवळ ग्रामीण भागातील जमिनीसाठी राहणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा