काय सांगता ! आता महाराष्ट्रात तलाठी राहणार नाही; तलाठी पद रिक्त करण्यासंदर्भात कृषीमंत्र्यांनी दिले मोठे संकेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Talathi News : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतीच एक मोठी अपडेट दिली आहे. कृषिमंत्र्यांनी महाराष्ट्रात तलाठी पदाबाबत मोठे संकेत दिले आहेत. खरं पाहता तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर राव गेल्या आठवड्यापूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर होते.

सध्या के सी आर राव महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या आठवड्यापूर्वी छत्रपती संभाजी नगर येथे त्यांच्या पक्षाची सभा आयोजित केली होती. या सभेदरम्यान के सी आर राव यांनी तेलंगणामध्ये तलाठी पद काढले असल्याची माहिती दिली होती.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे तलाठी पद मुक्त झाल्यामुळे तेलंगणातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र देखील तलाठी पद मुक्त होणार का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत होता.

हे पण वाचा :- पुणे, नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; ‘हा’ बायपास झाला खुला, Pune-Nashik प्रवासाचा वेळ वाचणार

शेतकऱ्यांमध्ये देखील याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता होती. दरम्यान पत्रकारांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना यासंदर्भात विचारणा केली. यावेळी कृषी मंत्री सत्तार यांनी याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

मंत्री महोदय यांच्या मते, जर तलाठी पद रद्द केल्यामुळे तेलंगाना मधील शेतकऱ्यांचा फायदा झाला असेल तर महाराष्ट्रात देखील हे पद रिक्त केले जाऊ शकते.

यासाठी मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करावी लागेल असं त्यांनी नमूद केले. जर हे पद रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर सकारात्मक निर्णय घेतील असं देखील त्यांनी सांगितलं.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी गोड बातमी ! ‘हा’ मेट्रो मार्ग प्रकल्प आता लवकरच होणार पूर्ण; सिडको उभारणार प्रकल्प, शासनाचा हिरवा कंदील

यासाठी मात्र अभ्यास करावा लागेल याबाबत सर्व आवश्यक माहिती घ्यावी लागेल यानंतर यावर योग्य तो निर्णय होईल असे देखील त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान यावेळी कृषीमंत्र्यांनी तलाठी पद रिक्त करण्यासाठी मी महसूल मंत्र्यांकडे विनंती करू शकतो.

कारण की ते खाते माझ्याकडे नाही असे देखील सांगितले. तलाठी पद मुक्त करून जर शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक थांबणारी असेल तर निश्चितच हे पद रिक्त करण्यासाठी आपण महसूल मंत्र्यांकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे विनंती करू असं सत्तार यांनी यावेळी पत्रकारांना कळवले आहे.

एकंदरीत, कृषिमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात खरंच तलाठी पद रद्द होईल का? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. यामुळे आता महाराष्ट्र सरकार यावर काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे. 

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा 29 एप्रिलचा हवामान अंदाज : ‘या’ जिल्ह्यात पडणार अतिमुसळधार पाऊस, काही भागात गारपीट पण होणार, पहा….

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा