Maharashtra Sugarcane Farming : महाराष्ट्रात ऊस या बागायती पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याची लागवड राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात सर्वाधिक पाहायला मिळते. याशिवाय, विदर्भातही काही ठिकाणी ऊस लागवड होते. एकंदरीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे उसाच्या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील एका प्रमुख कृषी विद्यापीठाने महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उसाची नवीन जात विकसित केली आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना ऊस पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे आणि साहजिकच यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण देखील सुधारणार आहे. दरम्यान आता आपण उसाच्या या नवीन जातीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केला ऊसाचा नवीन वाण?
मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने उसाची ही नवीन जात विकसित केली आहे. फुले ऊस 15006 असे या नवीन जातीचे नाव आहे. उसाची ही नुकतीच विकसित झालेली जात राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रसारित देखील करण्यात आली आहे.
नव्याने विकसित झालेल्या जातीच्या विशेषता
या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची तीनही हंगामांमध्ये लागवड केली जाऊ शकते. सुरू, पूर्व आणि आडसाली अशा तीन हंगामांमध्ये लागवडीसाठी उपयुक्त उसाच्या या जातीपासून शेतकऱ्यांना अधिकचे ऊस उत्पादन मिळणार आहे.
तसेच या जातीचा साखरेचा उतारा देखील हा इतर जातींच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
उसाच्या या नव्याने विकसित झालेल्या जातीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय.
उसाचे घटत चाललेले उत्पादन, वाढत चाललेला उत्पादन खर्च, सरकारचे उदासीन धोरण, ऊसतोड मजूर आणि वाहतूकदारांकडून केली जाणारे पिळवणूक, कारखानदारांकडून होणारी पिळवणूक या सर्व गोष्टी पाहता आता उसाऐवजी इतर पर्याय पिकांची लागवड केली जाऊ लागली आहे.
तथापि आजही असे अनेक शेतकरी आहेत जे की ऊस लागवडीला प्राधान्य देतात. दरम्यान जर ऊस पिकातून चांगले उत्पादन मिळाले तर नक्कीच याची लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
अशा परिस्थितीत उसाच्या या जातीपासून चांगले उत्पादन मिळणार असा दावा होत असल्याने याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असे म्हटले जात आहे.