Maharashtra Success Story : सफरचंद हे जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या थंड हवामानात वाढणारे पीक आहे. हे पीक देशाच्या इतर मैदानी भागात पिकवले जात नाही. या पिकासाठी हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर येथील हवामान खूपच पूरक आणि पोषक आहे.
त्यामुळे या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सफरचंद लागवड केली जाते. आता मात्र सफरचंदाचे पीक देशातील इतरही अन्य मैदानी भागांमध्ये उत्पादित होऊ लागले आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील प्रयोगशील शेतकऱ्याने देखील सफरचंद लागवड यशस्वी केली आहे.
खरे तर महाबळेश्वर हा परिसर स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. या ठिकाणी स्ट्रॉबेरीचे मळे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.
मात्र याच स्ट्रॉबेरीच्या आगारात खिंगर गावातील अनिल दुधाने या मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंतच्या शिक्षण घेतलेल्या प्रयोगशील शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी लागवडी बरोबरच सफरचंद शेती देखील यशस्वी करून दाखवली आहे.
अनिल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दोन वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेश येथून सोनेरी, रेड डिलिशियस, लाल अंबरी, मॉकीटोश आणि हरमन 99 या जातीच्या सफरचंदाची रोपे मागवली.
त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर लागवडीसाठी या विविध जातींची 20 रुपये मागवली. या रोपांची त्यांनी कलम करून लागवड केली. विशेष म्हणजे सफरचंद रोपे लागवड केल्यानंतर त्यांनी या झाडांना कोणतेच रासायनिक खत दिले नाही.
दरम्यान या विविध जातीच्या सफरचंद रोपांपैकी हरमन 99 या जातीच्या दोन झाडांना फळे लागली आहेत. यामुळे या प्रयोगशील शेतकऱ्याचा हा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.
अनिल यांनी लागवड केलेल्या हरमन 99 या जातीबाबत बोलायचं झालं तर या जातीची झाडे 12 फूट उंचीपर्यंत वाढतात. या फळांचा रंग काश्मिरी सफरचंद सारखाच भासतो.
वजन जेमतेम असते आणि या फळांची चव आंबट गोड असते. या जातीचे झाड 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमानात देखील वाढू शकते.