बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, येलो अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : राज्यात गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील काही भागात गारपीट झाली होती.

त्यामुळे तेथील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक अवकाळी पावसाच्या भक्षस्थानी गेले आहे. विशेष म्हणजे या चालू महिन्याची सुरुवात देखील आता पावसाने होणार असा अंदाज आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात अवकाळी पाऊस पुन्हा एकदा थैमान घालणार आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून यासंबंधीत भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अर्थातच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात या हंगामातील तिसरे नवीन चक्रीवादळ तयार होत आहे.

याला मिचान्ग असे नाव देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ 3 डिसेंबर पर्यंत तयार होणार असा अंदाज आहे.

म्हणजेच बंगालच्या उपसागरात 3 डिसेंबर पर्यंत नवीन चक्रीवादळ तयार होणार असून या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

शिवाय मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात देखील आगामी दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे.

हवामान खात्याने आज एक डिसेंबर 2023 रोजी राज्यातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी?

IMD ने आज राज्यातील विदर्भ विभागातील यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच आज उत्तर महाराष्ट्र विभागातील जळगाव नासिक आणि मराठवाड्यातील जालना व छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील यासंबंधीत जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना पावसाचा अंदाज घेऊनच आपल्या कामाचे नियोजन करावे असा सल्ला देण्यात आला आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा