Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. ती म्हणजे राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे मलभ गडद होऊ लागले आहेत. हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी देखील लावली आहे. दरम्यान हवामान खात्याने आज सुद्धा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढत चालली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच 9 एप्रिल 2024 ला विदर्भ विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला या 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तयार होत आहे.
तसेच आज मराठवाड्यात सुद्धा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. आज राज्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
शिवाय, मराठवाड्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार असा अंदाज यावेळी हवामान खात्याने दिला आहे.
कसं राहणार पुढील काही दिवसाच हवामान ?
उद्या अर्थातच दहा एप्रिलला राज्यात पावसाची शक्यता आहे. उद्या राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
उद्या विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या सर्व जिल्ह्यांना आयएमडीने येलो अलर्ट दिला आहे. जळगाव, सातारा, पुणे मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही उद्या पावसाची शक्यता राहणार आहे. यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
याशिवाय 11 आणि 12 एप्रिलला देखील राज्यातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या चार विभागात पाऊस हजेरी लावणार असे हवामान खात्याने आपल्या या नवीन बुलेटमध्ये स्पष्ट केले आहे.
एकंदरीत 12 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आता बारा एप्रिलनंतर हवामान कोरडे होणार का? याकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष राहणार आहे.