Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा गारपिटीसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. खरंतर गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वास्तविक नवीन वर्षाची सुरुवातच अवकाळी पावसाने झाले असून तेव्हापासून प्रत्येक महिन्याला अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या वादळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होत आहे. ज्यावेळी रब्बी हंगामातील पिकांची लागवड झाली होती तेव्हाच अवकाळी पाऊस झाला. यानंतर आता रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण झालेली आहे.
परंतु काही भागात अजूनही रब्बी पिकाची हार्वेस्टिंग सुरू आहे. यामुळे सदर शेतकऱ्यांना या वादळी पावसामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. दरम्यान आता आपण आयएमडीने नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठे बरसणार अवकाळी पाऊस अन कुठे होणार गारपीट
6 एप्रिल 2024 : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज 6 एप्रिल पासून ते 9 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू राहणार आहे. तसेच आज काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे. तसेच आज 6 एप्रिलला राज्यातील सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, मालेगावसह नाशिक, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
7 एप्रिल 2024 : उद्या अर्थातच 7 एप्रिलला राज्यातील विदर्भ विभागात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. वाशीम, यवतमाळ या 2 जिल्ह्यात गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर आयएमडीने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या सदर जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस तथा काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच उद्या वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या जिल्ह्यांना हलक्या पावसाच्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या मराठवड्यातही पाऊस बरसणार आहे.छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच खानदेश अर्थातच धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात सुद्धा उद्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
8 एप्रिल 2024 : आठ एप्रिलला पावसाचा जोर काहीसा वाढणार असे चित्र आहे. कारण की आठ एप्रिल राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे या दिवशी विदर्भातील तीन जिल्ह्यात गारपीट होणार आहे. यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होतो.
या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील इतर जिल्हे म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, जालना, बीड या आठ जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह काही भागात हलका ते मध्यम पाऊस होणार असे IMD ने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
9 एप्रिल 2024 : IMD ने म्हटल्याप्रमाणे 9 एप्रिल ला राज्यातील विदर्भ, मराठवाडा या विभागात हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज आहे. तसेच खानदेशमधील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बरसणार असे आय एम डी ने म्हटलेले आहे.