आज महाराष्ट्रातील ‘या’ 12 जिल्ह्यात जोरदार विजांसह बरसणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याचा येलो अलर्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. काल, राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली.

पण मॉन्सूनोत्तर बरसणाऱ्या अवकाळीचा जोर किंचित कमी झाला आहे. दरम्यान, आज अर्थातच 29 नोव्हेंबरला देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यातील जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये जोरदार विजांसह अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज असून या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खरे तर महाराष्ट्रात 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. यानुसार 25, 26, 27 आणि 28 नोव्हेंबरला राज्यात अवकाळी पाऊस आहे.

विशेष म्हणजे 26 तारखेला काही भागात अति मुसळधार पाऊस होईल आणि गारपीट होईल असा देखील अंदाज हवामान खात्याने दिला होता.

दरम्यान, हा देखील हवामान अंदाज खरा ठरला असून 26 तारखेला राज्यातील विविध भागांमध्ये गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

पण काल अर्थातच 28 तारखेपासून राज्यात पावसाचा जोर ओसरण्यास सुरवात झाली आहे. मात्र अवकाळी पावसाचा जोर कमी होत असला तरी देखील आज विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत.

आज २९ नोव्हेंबर रोजी राज्यातील मध्य महाराष्ट्रातील काही भागात, मराठवाड्यातील काही भागात आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना आज पुन्हा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मात्र उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा