मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 7 जिल्ह्यात आजपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार ! वाचा हवामान खात्याचा नवीन अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कमाल तापमान थोडेसे वाढले आहे. राज्यातील तापमानातं सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.

याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागात थंडीची तीव्रता थोडीशी कमी झाली आहे. आता नोव्हेंबर महिना हा जवळपास संपत चालला आहे तरी देखील महाराष्ट्रात अजून म्हणावी तशी थंडी पडलेली नाही.

यामुळे कडाक्याच्या थंडीला अखेर सुरुवात केव्हा होणार हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अशातच आता हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून आजपासून राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सात जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यातील सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना विशेष सावध राहणे अपेक्षित आहे.

या अवकाळी पावसामुळे कोकणातील ज्या शेतकऱ्यांचे धान पीक काढण्याचे बाकी असेल त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पण मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील ज्या भागात पावसाळी काळात कमी पाऊस पडला आहे तेथील शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस फायदेशीर ठरू शकतो.

मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील काढणी केलेली पिके, शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवणे आवश्यक आहे. अवकाळी पाऊस हा नेहमी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडासह बरसतो.

यामुळे शेतकऱ्यांनी पशुधनाची देखील काळजी घेणे अपेक्षित आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधावे असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.

आता आपण मध्य महाराष्ट्रातील आणि कोकणातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो याबाबत भारतीय हवामान विभागाने दिलेली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

कुठं बरसणार पाऊस

IMD ने सांगितल्याप्रमाणे, कोकणातील या दक्षिणेकडील जिल्ह्यात म्हणजे सिंधुदुर्गमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD ने या जिल्ह्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय मते महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा