Maharashtra Rain : सावधान! ‘या’ जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : राज्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. राज्यातील अनेक विभागात पावसाची (Monsoon) नोंद केली जात आहे. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात परतीचा पाऊस (Monsoon News) चांगलाच कोसळत असल्याचे चित्र आहे.

परतीचा पाऊस (Maharashtra Rain) विजांच्या कडकडाटासह बरसत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं देखील आव्हान या वेळी तज्ञांकडून केले जात आहे. आज देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले आहे.

आज राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता (Rain Alert) असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे. दरम्यान राज्यातील उर्वरित भागात आज ढगाळ हवामान पाहायला मिळणार असून काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सध्या भारत वर्षातून सर्वत्र परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.

परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झाले असल्याने आज राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान या कालावधीत कोसळणारा पाऊस विजांच्या कडकडाटासह बरसणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. मित्रांनो आज भारतीय हवामान विभागाकडून कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले गेले आहे.

तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे. विजांचं पाऊस कोसळणार असल्याने भारतीय हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना पावसाचा येलो ॲलर्ट जारी केला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार या वर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळी काळात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा जवळपास 23 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने सार्वजनिक केली आहे. मात्र असे असले तरी राज्यात या वर्षी पावसाचे मोठे असमान वितरण पाहायला मिळाले आहे.

अशा परिस्थितीत पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान राज्यातील अनेक प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली असल्याने आगामी काळात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे सांगितले जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment