Maharashtra Rain  : राज्यात पावसाचा जोर झाला कमी, पण या विभागात होणार जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र असे असले तरी राज्यातील अनेक भागात अजूनही जोरदार स्वरूपाचा पाऊस (Maharashtra Rain) बरसत आहे. यामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांना थोडा फटका बसला आहे.

दरम्यान काल भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पावसाची (Rain Alert) शक्यता वर्तवली होती. मात्र काल तुरळक ठिकाणी पावसाची (Monsoon) हजेरी बघायला मिळाली. राज्यात जवळपास सर्वत्र पावसाची उघडीप होती. यामुळे राज्यात शेती कामाला वेग आला आहे.

दरम्यान राज्यातील अनेक धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अशा परिस्थितीत नदीकाठी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने आज देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज विदर्भात पावसाची शक्यता आहे.

पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने विदर्भासाठी आज येलो ॲलर्ट जारी केला आहे. याशिवाय अहमदनगर आणि खानदेशातील जळगाव या दोन जिल्ह्यात देखील भारतीय हवामान विभागाने पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात पावसाची शक्‍यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतीपीके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला असून उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार स्वरूपाचा पावसामुळे राज्यातील खरीप हंगामाच्या सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांना मोठा फटका बसला असून उत्पादनात घट होणार आहे.

मागील चार ते पाच दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरी भागात वाहतूक कोंडी सारखे समस्या बघायला मिळाले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी धरणाच्या पाण्याचा विसर्ग देखील सुरू असल्याने नदीकाठी वसलेल्या लोकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील केले जात आहे.

मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अनुषंगाने राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी 3500 कोटी रुपयांची मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. आता मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचे चित्र आहे, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment