Maharashtra Rain : सावधान! आज ‘या’ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा (Rain) जोर कायम आहे. गेले काही दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Monsoon) बघायला मिळाला. यामुळे काढण्यासाठी आलेल्या खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

कोकणात आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागात महिलांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (Rain Alert) असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाची उघडीप राहणार आहे, पावसाचा जोर चांगलाच ओसरणार आहे. निश्चितच यामुळे उत्तर महाराष्ट्रातील तसेच मराठवाडा विदर्भातील आणि उत्तर कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असेल.

मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला होता. यामुळे या विभागातील शेती पिकांना मोठा फटका बसला होता. मात्र आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तुरळक भाग वगळता पावसाची उघडीप राहणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते, येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात मान्सून माघार घेणार आहे. निश्चितच आज दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली गेली असल्याने संबंधित विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याने तसेच सध्या परतीचा पाऊस देखील चांगलाच बरसात असल्याने एका रब्बी हंगामासाठी या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आता राज्यात थंडीचा जोर वाढणार असल्याचे तज्ञांनी नमूद केले आहे. त्यामुळे शेती पिकांना विशेषतः फळबाग पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment