तहानलेल्या महाराष्ट्रासाठी खुशखबर ! पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा पाऊस पडणार, हवामान विभागाचा नवीन अंदाज काय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : मान्सून हा अंतिम टप्प्यात आला आहे. अजून महाराष्ट्रासहित देशातील काही भागात मान्सूनची सक्रियता आहे. पण मान्सून हा परतीच्या वाटेवर आहे. येत्या काही दिवसात मान्सून संपूर्ण देशाला निरोप देणार आहे. यावर्षी मात्र मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

सुरुवातीला जून महिन्यात पाऊस झाला नाही, यानंतर जुलै महिन्यात मुसळधार बरसल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा विश्रांती घेतली. सप्टेंबर महिन्यात चांगला झाला. मात्र जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने जून आणि ऑगस्ट महिन्यातील सरासरी भरून काढली नाही. यामुळे खरीप हंगामातील पिके प्रभावित झाली असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिवाय आगामी रब्बी हंगामातील पीक पेरणी देखील कमी पावसामुळे प्रभावित होणार असून पीक लागवडीखालील क्षेत्र घटण्याची भीती आहे. यामुळे परतीचा पाऊस का होईना पण चांगला जोरदार बसावा, शेत शिवारात पाणी-पाणी व्हावे, ओढे-नाले वाहावे अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे. दरम्यान शेतकऱ्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

कारण की महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे. राज्यात राजधानी मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाची आहे.

याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील आज अर्थात 16 आणि उद्या 17 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहील तर तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस बरसेल, असा अंदाज आहे.

मात्र 18 ऑक्टोबरनंतर राज्यात पुन्हा एकदा ऑक्टोबर हिट अनुभवायला मिळणार आहे. 18 ऑक्टोबर नंतर राज्यातील तापमान पुन्हा एकदा वाढणार असा अंदाज आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून अजूनही मान्सून परतलेला नसून कोकणातील वेंगुर्ला मध्ये सध्या मान्सून खिळून बसला आहे. पण येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला मान्सून निरोप देणार आहे.