महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार ! येलो अलर्ट जारी, वाचा हवामान खात्याचा नवीन अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : काही दिवसांपूर्वी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. संबंधित भागात काही दिवस अवकाळी पाऊस बरसल्यानंतर राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले आहे.

मध्यंतरी काही काळ थंडीची देखील चाहूल लागली होती. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये गुलाबी थंडीमुळे अल्हाददायक वातावरण तयार झाले होते. मात्र आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील हवामानात पुन्हा थोडासा बदल पाहायला मिळत आहे.

राज्यातील कमाल आणि किमान तापमान थोडीशी वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात आता थंडीचा जोर काहीसा कमी झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान देखील तयार झाले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने उद्या अर्थातच 23 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात उद्या अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या कोकणातील दक्षिण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडासह हलका ते मध्यम पाऊस बरसणार असा अंदाज आहे.

विशेष म्हणजे उद्या या संबंधित जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आली आहे. अर्थातच या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडणार आहे.

यामुळे या संबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना या कालावधीत विशेष सजग आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय उद्या मध्य महाराष्ट्रातील सातारा तसेच मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे.

उर्वरित राज्यात मात्र उद्या प्रामुख्याने हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे पण काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील असे देखील आयएमडीने स्पष्ट केले आहे.

विशेष बाब अशी की, IMD ने शुक्रवारपासून म्हणजे 24 नोव्हेंबर पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. 24 नोव्हेंबर पासून ते 27 नोव्हेंबर पर्यंत राज्याचा विविध भागात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तसेच या कालावधीत पावसाचा जोर थोडासा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारतीय हवामान विभागाचा अंदाज खरा ठरतो का आणि महाराष्ट्रातील या संबंधित जिल्ह्यात आता अवकाळी पाऊस हजेरी लावतो का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा