Maharashtra Rain : महाराष्ट्रातील हवामानात आता पुन्हा एकदा एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील हवामानाबाबत अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने राज्यात 25 तारखेनंतर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यातील जवळपास 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे तेथील शेती पिकांवर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला होता.
अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता सांगितली जात आहे. यामुळे महाराष्ट्रात जोरदार थंडीला सुरवात केव्हा होणार, कडाक्याची थंडी केव्हा पडणार हा सवाल कायम आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग
नोव्हेंबर महिना संपायला मात्र सात दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी महाराष्ट्रात चांगली थंडी पडत असते. यावर्षी मात्र थंडीचा जोर अजूनही म्हणावा तसा वाढलेला नाही. गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी राज्यातील कमाल आणि किमान तापमानात थोडीशी घट झाली होती.
त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये गारठा जाणवू लागला होता. पण आता गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यातील कमाल तापमान थोडेसे वाढलेले असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान तयार झाले आहे.
याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा थंडीचा वाढलेला जोर कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ‘पूर्वी वारा झाेता’मुळे देशातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे.
सध्या देशातील तामिळनाडू आणि केरळ या राज्यात पावसाचा जोर पाहायला मिळतं आहे. दरम्यान त्या ठिकाणी सुरू असलेल्या या जोरदार पावसामुळे आता महाराष्ट्रात देखील पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
केरळ आणि तामिळनाडू मध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे महाराष्ट्रात 23 आणि 24 नोव्हेंबरला ढगाळ हवामान तयार होणार असून 25 नोव्हेंबर पासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठे पडणार अवकाळी पाऊस
राज्यात 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी नुसार या कालावधीमध्ये राज्यातील काेकण, सिंधुदुर्ग, खांदेश, नाशिक, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे.
या कालावधीत विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिराेली या जिल्ह्यासमवेतचं महाराष्ट्रातील जवळपास 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. उर्वरित विदर्भात मात्र या कालावधीमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि त्या ठिकाणी पाऊस पडणार नाही असा अंदाज आहे.