पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूरसह 20 जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार ! तुमच्याकडे कसं राहणार हवामान? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याच्या मान्सूनकाळात फक्त जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. जून आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यात सरासरी एवढा पाऊस झाला नाही.

ऑगस्ट महिन्यात तर सरासरीच्या 40% पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे खरीपातील पिकांना याचा मोठा फटका बसला. अनेक भागातील पिके करपली आहेत. मात्र आता पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचे पुनरागमन झाले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली आहे. काल आणि परवा राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज अर्थातच 3 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील एकूण 20 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती पाहता सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. आज मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात मात्र हलका पाऊस पडणार असे हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे.