Maharashtra Rain : आज अहमदनगरसमवेतच ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Rain) संततधार सुरूच आहे. राज्यातील अनेक भागात अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Rain) कोसळत असल्याने जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, काल देखील राज्यातील अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) झाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे तर काही ठिकाणी खरीप हंगामातील पिके अतिवृष्टी सारख्या पावसामुळे धोक्यात सापडली आहेत.

राजधानी मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी रात्री पावसाने हजेरी लावली असून सकाळी देखील राजधानी मुंबईसह ठाण्यात पावसाची रिपरिप बघायला मिळत आहे. मुंबई आणि ठाणे या व्यतिरिक्त राज्यातील पालघर अकोला पुणे भिवंडी या परिसरात देखील पावसाची (Monsoon News) दमदार हजेरी बघायला मिळाली आहे.

दरम्यान, राज्यात आगामी काही दिवस पावसाचेचं राहणार असल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार, आज मराठवाड्यात तसेच विदर्भात पावसाची शक्यता आहे.

पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यामुळे विदर्भ वासियांना तसेच विदर्भातील शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन जाणकार करत आहेत.

याव्यतिरिक्त मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, लातूर बीड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय अहमदनगर (ahmednagar news) आणि जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, राज्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक धरणे शंभर टक्के क्षमतेने पूर्ण तुडुंब भरली आहेत. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे. अशा परिस्थितीत नदीकाठी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment