Maharashtra Rain : महाराष्ट्रात आज पण पावसाच्या धारा! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या विविध भागात सध्या परतीचा पाऊस (Rain) अक्षरशा थैमान माजवत आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या (Farmer) शेती पिकाला मोठा फटका बसला आहे. शेतकरी बांधवांनी अतिवृष्टी मधून कसाबसा आपल्या पिकांना वाचवलं आणि अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांची जोपासना केली.

मात्र आता खरीप हंगामातील (Kharif Season) पिके अंतिम टप्प्यात आली असतानाच परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची नासाडी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. खरीप हंगामातील मुख्य पीक अर्थातच सोयाबीन पिकाची काढणी प्रगतीपथावर आहे.

अशा परिस्थितीत सध्या कोसळत असलेल्या पाऊस काढण्यासाठी आलेल्या सोयाबीन समवेतच इतर सर्व खरीप हंगामातील पिकांसाठी घातक ठरत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा दावा जाणकार लोकांकडून केला गेला आहे. दरम्यान महाराष्ट्रात आज देखील पावसाची शक्यता (Rain Alert) असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) नमूद केले. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र पावसाची शक्यता आहे.

कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्‍यता आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र आज सर्वत्र पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, काल देखील राज्यात राजधानी मुंबईसह ठाणे परिसरात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. अकोला, बीड, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरी भागात काही काळ जनजीवन विस्कळीत होते तर शेती पिकांना देखील याचा मोठा फटका बसला आहे.

दरम्यान जाणकार लोकांच्या मते सध्या कोसळत असलेल्या परतीचा पाऊस आगामी हंगामासाठी विशेष अनुकूल राहणार आहे. जाणकार लोकांच्या मते याच्या रब्बी हंगामासाठी परतीच्या पावसामुळे पावसाची कमतरता भासणार नाही. तसेच यावर्षी राज्यातील सर्व प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले असल्याने उन्हाळी हंगामात देखील पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे मत जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे. निश्चितच खरीप हंगामात ज्या पावसामुळे शेतकरी बांधवांना नुकसान सहन करावे लागले आहे त्याच पावसामुळे रब्बी हंगामात शेतकरी बांधवांना फायदा देखील होण्याची शक्यता आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment