Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसासाठी (Rain) पोषक वातावरण तयार होत आहे. काल देखील परतीचा पाऊस (Monsoon) राज्यात चांगला बरसला आहे. यामुळे निश्चितच खरीप हंगामातील काढण्यासाठी आलेल्या पिकांना फटका बसत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील पिकांची विशेषता सोयाबीन पिकाची काढणी प्रगतीपथावर आहे.
या परिस्थितीत परतीचा पाऊस (Monsoon News) सोयाबीन पिकासाठी घातक ठरू शकतो असे जाणकार सांगत आहेत. दरम्यान आज देखील राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह देखील पावसाची (Rain Alert) शक्यता वर्तवण्यात आली आहे. निश्चितच या अनुषंगाने नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम आहे. यामुळे राज्यात तापमानात कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी राज्यात उकाडा मात्र वाढला आहे.
आज या जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या नवीनतम सुधारित हवामान अंदाजानुसार, आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस कोसळणार आहे. काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
या अनुषंगाने कोकणातील या सर्व जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय आज मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
तसेच आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने या विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.