Maharashtra Rain : गेल्या 11 ते 12 दिवसांपासून महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाची तीव्रता काहीशी अधिक पाहायला मिळतं आहे. मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस होत आहे.
पुणे, नाशिक, अहमदनगर समवेतच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून आगामी काही दिवस राज्यात पावसाळी वातावरण कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आज महाराष्ट्रातील तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मान्सून संदर्भात देखील एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे.
वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत असली तरी देखील मान्सून आगमना संदर्भात भारतीय हवामान खात्याने गुड न्यूज दिली असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काल अर्थातच 19 मे 2024 ला मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. दरवर्षी अंदमानात मान्सूनचे 22 जूनच्या सुमारास आगमन होत असते. यंदा मात्र तीन दिवस आधीच अंदमानात मान्सून दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे 31 मे च्या सुमारास मान्सूनचे केरळात आगमन होण्याची शक्यता आहे. यामध्ये मात्र तीन-चार दिवस मागे पुढे होऊ शकतात असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. म्हणजेच 28 मे ते 3 जून या कालावधीत कधीही केरळात मान्सून दाखल होईल असे आयएमडीने सांगितले आहे.
तसेच जर आगामी काळातही मान्सूनसाठी असेच पोषक हवामान तयार राहिले तर महाराष्ट्रात 9 ते 16 जून या कालावधीत मान्सूनचे आगमन होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तत्पूर्वी मात्र महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
या जिल्ह्यांमध्ये बरसणार मान्सून पूर्व पाऊस
बीड, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज मान्सून पूर्व पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
या संबंधित अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याच्या माध्यमातून येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार अशी शक्यता असून यासंबंधी जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.