Maharashtra Rain Alert : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या महिन्यात अर्थातच एप्रिल महिन्यात देखील वादळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
शेतकरी बांधवांना वादळी पावसामुळे लाखों रुपयांचा आर्थिक भ्रूदंड सहन करावा लागला आहे. दरम्यान या मे महिन्यातही वादळी पावसाने तडाखा दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात वादळी पाऊस थैमान घालत आहे.
यामुळे राज्यभरातील शेतकरी चिंतेत आले आहेत. खरेतर काही भागांमध्ये रब्बी पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण झाली आहे आणि शेतकरी बांधव आता आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहेत. मात्र, काही ठिकाणी उन्हाळी पिकांची लागवड झाली आहे.
तसेच काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. या शेती पिकांना मात्र या वादळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या वादळी पावसामुळे फळबागांना देखील फटका बसू शकतो आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते असे म्हटले जात आहे.
विशेष बाब अशी की जे शेतकरी बांधव आगामी खरीप हंगामासाठी पूर्व मशागत करत आहेत त्यांच्या कामांवर देखील या वादळी पावसामुळे विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज देखील राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.
राज्यातील अमरावती, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात आज वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आय एम डी च्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
विशेष बाब अशी की शनिवार पर्यंत राज्यातील कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. एकंदरीत आगामी काही दिवस राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.