अवकाळी महाराष्ट्राची पाठ सोडेना ; राज्यातील ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार, किती दिवस बरसणार ? हवामान खात्याचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : गेल्या महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

सध्या राज्यातील काही भागांमध्ये थंडी, काही भागांमध्ये ऊन आणि काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. शातच आता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने 13 डिसेंबर पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज वर्तवला आहे.

कोणत्या भागात बरसणार अवकाळी

आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, राज्यातील विदर्भ प्रांतात 13 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. या विभागातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर,गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

एकंदरीत आगामी काही दिवस पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र काही ठिकाणी ढगाळ हवामान तयार होणार आहे. याशिवाय राज्यातील काही भागांमध्ये गारठा वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील काही भागांमध्ये कमाल तापमान थोडेसे कमी होईल आणि हळूहळू थंडीला सुरुवात होईल असे मत हवामान तज्ञांच्या माध्यमातून वर्तवले जात आहे. 

एकंदरीत महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातील पूर्व भागात आगामी चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.

उर्वरित राज्यात मात्र थंडीचा जोर वाढेल असा अंदाज असल्याने रब्बी हंगामातील पिकांसाठी हे वातावरण पोषक ठरणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा