Maharashtra Rain Alert : ऑगस्ट च्या शेवटी पावसाने विश्रांती घेतली होती. जवळपास सात-आठ दिवस पाऊस गायब होता. म्हणून शेतकरी बांधव चिंतेत सापडले होते. पावसाची विश्रांती मोठा खंड पाडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना होती. पण, सप्टेंबर ची सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना जास्तीच्या पावसामुळे भीती वाटू लागली.
31 ऑगस्ट च्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. एक सप्टेंबरला पावसाने गियर ओढला आणि राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम होता. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील काही भागात अतिवृष्टी सारख्या पावसाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापसाचे पीक बरबाद झाले.
यामुळे आता पाऊस विश्रांती कधी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. 31 ऑगस्ट च्या मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस फक्त दोन सप्टेंबर पर्यंत जोरदार बरसला.
मात्र या दोन दिवसांमध्येच पावसाने मागची पुढची सर्व कसर भरून काढली. आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पाऊस पूर्णपणे गायब झाला आहे.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने आयएमडीने सदरील जिल्ह्यांना येलो अलर्ट म्हणजेच पिवळा इशारा जारी केला आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 5 सप्टेंबर रोजी राज्यातील विदर्भ विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
अर्थातच राज्याच्या उर्वरित भागांमध्ये आज पाऊस पडणार नाही असा अंदाज आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आज हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
तसेच उद्या अर्थातच सहा सप्टेंबरला राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील सातारा अन कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उद्या हे चार जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित 32 जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, जोराचा पाऊस पडणार नाही, पाऊस झाला तरी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.