Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसाचे कमाल तापमान विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे सकाळचे किमान तापमानही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले असून राज्यात सर्वत्र उकाडा जाणवत आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस वर पोहोचले होते. तसेच मालेगाव येथील तापमान 42 अंश सेल्सिअस वर पोहोचले.
विदर्भ विभागातील अकोला येथील तापमान मात्र 42.8°c वर पोहोचले आहे. मात्र अजून तर एप्रिल महिन्याला सुरुवातही झालेली नाही. यामुळे एप्रिलमध्ये तापमानाचा पारा आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार अशी भीती व्यक्त होत आहे.
ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है ! अशी काहीशी परिस्थिती यंदाच्या उन्हाळ्या बाबत पाहायला मिळतेय. वाढत्या तापमानामुळे नागरिक घामाघुम होत आहेत. अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे.
अशातच मात्र भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या अर्थातच 29 आणि 30 मार्चला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रातील तथा मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव आणि विदर्भ विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने यावेळी जाहीर केला आहे.
तसेच उद्या अर्थातच 30 मार्च 2024 ला मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. परंतु या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे.
पण, या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
दुसरीकडे आय एम डी ने विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी अर्थातच 29 आणि 30 मार्च 2024 साठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील तापमान आधीच चाळीस अंश सेल्सिअस पार गेले आहे. अकोल्याचे तापमान तर 43 अंश सेल्सिअस जवळ पोहोचले आहे.
त्यामुळे आता यामध्ये आणखी वाढ होणार अशी भीती आहे. परिणामी सर्वसामान्यांनी वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि खूपच आवश्यकता असेल तेव्हाच उन्हात बाहेर पडावे अन्यथा घरीच राहावे असे आवाहन यावेळी जाणकार लोकांनी केले आहे.