मोठी बातमी ! हवामानात मोठा चेंज, आज राज्यातील ‘या’ भागात जोराचा पाऊस बरसणार, दिवाळीत कसं राहील हवामान ? IMD ने दिली मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain 2023 : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांमध्ये मोठा चेंज पाहायला मिळत आहे. राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. तापमानात सतत चढ-उतार होत असल्याने आणि ढगाळ हवामान तयार होत असल्याने राज्यातील नागरिकांना अजूनही कडाक्याच्या थंडीची अनुभूती झालेली नाही.

तर काही ठिकाणी अजूनही दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. यामुळे यंदा कडाक्याच्या थंडीला केव्हा सुरुवात होणार हा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या एका हवामान अंदाजात यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कमाल आणि किमान तापमान नेहमीच्या तुलनेत थोडेसे अधिक भासणार असे सांगितले आहे.

त्याचा परिणाम म्हणून यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात हिवाळ्याला सुरुवात झाली आहे, पण कडाक्याची थंडी नोव्हेंबर महिन्यातून गायब राहील असे यावरून स्पष्ट होत आहे.

मात्र दिवाळी झाल्यानंतर परिस्थिती बदलू शकते आणि कडाक्याच्या थंडीला सुरुवात होऊ शकते असे देखील मत व्यक्त होत आहे. अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे महाराष्ट्रात आगामी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आगामी काही दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस

इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अर्थातच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच 6 नोव्हेंबर 2023, सोमवारी सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

तसेच उद्या अर्थातच 7 नोव्हेंबरला राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या 4 जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय राज्यात बुधवारी सुद्धा पाऊस पडण्यासाठी पोषक हवामान तयार होणार आहे.

बुधवारी राज्यातील सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात पावसाचा शिडकावा होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे. यामुळे आता भारतीय हवामान खात्याचा हा नवीन सुधारित हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे शेतकऱ्यांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठी बारीक लक्ष लागून राहणार आहे.

दरम्यान दिवाळी सणाला आता फक्त तीन दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. अशातच हवामान खात्याने दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्थातच आठ नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे यंदाची दिवाळी पावसात जाणार का हा देखील मोठा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. तूर्तास मात्र आठ तारखेपर्यंत भारतीय हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा