Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने मुंबई मधून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मुंबईमधील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. खरंतर, उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उन्हाळी सुट्ट्या तर सुरूच आहेत शिवाय नऊ तारखेला गुढीपाडव्याचा देखील सण साजरा होणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातून सुटणाऱ्या विविध रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान हीच गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
मध्य रेल्वेने अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली यादरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दरम्यान, आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक तथा या गाडीला कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे याविषयी माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, एल टी टी ते कोचुवेली ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 11.04.2024 ते 27.06.2024 या कालावधीत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून संध्याकाळी 4:00 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री पावणे नऊ वाजता ही गाडी कोचुवेली येथे पोहोचणार आहे.
तसेच कोचुवेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष साप्ताहिक गाडी 13.04.2024 ते 29.06.2024 या कालावधीत दर शनिवारी कोचुवेली येथून दुपारी 4:20 वाजता सुटून आणि दुसऱ्या दिवशी रात्री 09.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार अशी माहिती समोर आली आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या विशेष गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
ही ट्रेन ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरूर, शोरानूर, त्रिसूर, कोट्टानम, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम आणि कोल्लम जं या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याने मुंबईहून कोकणात आणि कोकणातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.