Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जसं की आपण पाहतच आहात की, सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत अन या उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळांवर गर्दी करत असून अनेकजण आपल्या मूळ गावाला परतत आहेत.
यामुळे राज्यातील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. विविध मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. दरम्यान ही प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार दोन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. बांद्रा टमिर्नस ते पटना आणि उधना ते भागलपूर यादरम्यान या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
अशा परिस्थितीत आता आपण पश्चिम रेल्वेने सुरू केलेल्या या दोन विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे राहणार आणि या गाड्यांना कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार याविषयी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या दोन्ही विशेष गाड्या कालपासून अर्थातच 29 एप्रिल 2024 पासून सुरू झाल्या आहेत. यातील बांद्रा टमिर्नस ते पटना उन्हाळी विशेष ट्रेन ही सोमवारी रात्री ८ वाजून २५ मिनिटाने सुटणार आहे आणि बुधवारी दुपारी १ वाजेला पटना येथे पोहोचणार आहे.
तसेच, उधना ते भागलपूर विशेष गाडी सोमवारी रात्री ८ वाजता उधना येथून निघणार आहे तर बुधवारी भागलपूर येथे दुपारी १ वाजेला पोहोचणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
हाती आलेल्या माहितीनुसार बांद्रा टर्मिनस ते पटना ही उन्हाळी विशेष गाडी बोरीवली, पालघर, बोईसार, वापी, भेस्टन चालठान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई, कानपूर सेंट्रल, प्रयागराज, मिर्झापूर, पं. दीन दयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
तसेच उदना ते भागलपुर ही उन्हाळी विषयाची गाडी या मार्गावरील चालठान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई, कानपूर सेंट्रल, प्रयागराज, मिर्झापूर, पं. दीन दयाल उपाध्याय, बक्सर, अरा, पटना, भक्तीयारपूर, मोकामा, किऊल, जमालपूर आणि सुल्तानगंज या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.