Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट मुंबई आणि पुण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष महत्त्वाचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने 30 अन 31 ऑगस्टला वाहतूक आणि पावर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि पुण्यातून धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या रद्द होणार आहेत.
अशा परिस्थितीत जर तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन बनवत असाल तर प्रवासा आधी ही बातमी तुम्ही नक्कीच वाचायला हवी. मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने भुसावळ विभागात उद्या अर्थातच 30 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते 31 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाजवळ ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
खरंतर यापूर्वी मध्ये रेल्वेने या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर तब्बल 14 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून आपला पूर्वीचा निर्णय फिरवण्यात आला आहे. आता मध्य रेल्वे या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर केवळ आठ गाड्या रद्द करणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण मध्य रेल्वे या ब्लॉकमुळे कोणत्या आठ गाड्या रद्द करणार आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या गाड्या होणार रद्द?
- या ब्लॉगच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने 29 ऑगस्ट रोजी धावणारी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते बल्लारशाह विशेष एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच 30 ऑगस्टला धावणारी बल्लारशाह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.
- 30 ऑगस्टला धावणारी भुसावळ-वर्धा एक्स्प्रेसही रद्द राहणार आहे.
- 31 ऑगस्टची वर्धा-भुसावळ एक्स्प्रेसही रद्द राहणार आहे.
- 30 ऑगस्टला धावणारी पुणे-अमरावती एसी एक्स्प्रेसही या ब्लॉकमुळे रद्द राहणार आहे.
- मध्य रेल्वेने 31 ऑगस्टला धावणारी अमरावती-पुणे एसी एक्स्प्रेस सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
- 31 ऑगस्टला धावणारी भुसावळ-बडनेरा विशेष पॅसेंजर ( गाडी देखील या ब्लॉकमुळे रद्द राहणार आहे.
- बडनेरा-भुसावळ ही 31 ऑगस्टला धावणारी गाडी देखील या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा मोठा निर्णय मध्ये रेल्वेने घेतला आहे.