मुंबई, पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ 14 एक्सप्रेस गाड्या रद्द, प्रवासाआधी एकदा वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : तुमचाही कुठे रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन आहे का ? अहो मग प्रवास सुरू करण्याआधी ही बातमी एकदा वाचाच. खरे तर, आपल्या देशात एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करायचा म्हटला की सर्वप्रथम रेल्वेला पसंती दाखवली जाते.

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार आहे. दुसरे म्हणजे भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील प्रत्येक शहरात आणि भागात पोहोचलेले आहे.

म्हणून कुठेही जायचे असले तरी देखील रेल्वे गाडी उपलब्ध आहे. मात्र जर तुम्ही सध्या स्थितीला कुठे प्रवासाचे नियोजन करत असाल आणि रेल्वेने प्रवास करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्याहून धावणार काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

नागपूर विभागातील कन्हान रेल्वे स्थानकावर तिसरी लाइन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. यासाठी दोन ते 14 डिसेंबर दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे.

त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण की या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील भुसावळ मार्गे धावणाऱ्या तब्बल 14 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोणत्या एक्सप्रेस गाड्या होणार रद्द

 • १२८७० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस (८ डिसेंबर)
 • १२८६९ सीएसएमटी- हावडा एक्स्प्रेस (१० डिसेंबर)
 • २२९०५ ओखा-शालिमार एक्स्प्रेस (१० डिसेंबर)
 • २२९०६ शालिमार – ओखा एक्सप्रेस (१२ डिसेंबर)
 • १२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस (८ व ९ डिसेंबर)
 • १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस (१० व ११ डिसेंबर)
 • १३४२५ मालदा टाउन- सुरत एक्स्प्रेस (२ व १२ डिसेंबर)
 • १३४२६ सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस (४ व ११ डिसेंबर)
 • १२१०१ एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस (८, ९, ११ व १२ डिसेंबर)
 • १२१०२ शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस (१०, ११, १३ व १४ डिसेंबर)
 • २०८२३ पुरी-अजमेर एक्स्प्रेस (४, ७ व ११ डिसेंबर)
 • २०८२४ अजमेर-पुरी एक्स्प्रेस (७, १२ व १४ डिसेंबर)

या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना 14 डिसेंबर पर्यंत प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा