Maharashtra Railway News : सध्या राज्यासहित संपूर्ण देशभरात उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होत आहे. दरम्यान या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर विविध रेल्वे मार्गांवर काही विशेष गाड्या प्रशासनाच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत.
अशातच राज्यातील मुंबई आणि कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणाऱ्या अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई येथून काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच या विशेष गाडीला 18 रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान या विशेष गाड्या चालवणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-थिवी- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष साप्ताहिक ट्रेन
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, एल टी टी – थिवी – एल टी टी या गाडीच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी अशा 8 आणि थिवी ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशा आठ म्हणजे एकूण 16 फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक 01187 ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी ही विशेष साप्ताहिक गाडी 18 एप्रिल ते सहा जून पर्यंत दर गुरुवारी एलटीटी येथून रात्री सव्वा दहा वाजता रवाना होईल आणि थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे.
तसेच गाडी क्रमांक 01188 ही गाडी 19 एप्रिल ते सात जून पर्यंत तर शुक्रवारी सायंकाळी चार वाजून 35 मिनिटांनी थिवी रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि एलटीटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी पहाटे पावणे चार वाजता पोहोचणार आहे.
कुठं थांबणार ही विशेष गाडी ?
मध्य रेल्वेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ही साप्ताहिक गाडी या मार्गावरील ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.