Maharashtra Railway News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये वाहतुकीच्या क्षेत्रात सातत्याने नवनवीन शोध लावले जात आहेत. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः रेल्वे वाहतूक सुधारण्यावर अधिक भर दिला जात आहे.
रेल्वे वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक सक्षम बनवण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड ट्रेन चालवल्या जात आहेत. देशाच्या विविध भागात सेमी हायस्पीड गाड्या सुरू झाल्या आहेत. रॅपिड रेल्वे देखील सुरू झाली आहे. तसेच भारतात बुलेट ट्रेनचे कामही वेगाने सुरू आहे.
विशेष बाब म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे साधारण ट्रेन देखील चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. वास्तविक, वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झाली. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सर्वप्रथम वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन सुरू झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील एकूण 34 महत्त्वाचा मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे या 34 पैकी सहा गाड्या आपल्या महाराष्ट्रातून धावत आहेत. राज्यातील मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, इंदूर ते नागपूर या सहा मार्गांवर ही गाडी धावत आहे.
विशेष म्हणजे या गाड्यांना रेल्वे प्रवाशांनी भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही प्रवाशांमध्ये अल्पकालावधीतच लोकप्रिय ठरली आहे. मात्र या गाडीचे तिकीट दर अधिक असल्याने ही गाडी फक्त श्रीमंतांसाठी सुरू झाली आहे असा आरोप केला जात आहे.
हेच कारण आहे की सर्वसामान्यांसाठी आता भारतीय रेल्वेने वंदे साधारण ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला पुश पूल ट्रेन म्हणूनही ओळखले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि बिहार दरम्यान देशातील पहिली पुश पूल ट्रेन चालवली जाणार अशी माहिती समोर आली आहे.
देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते बिहारची राजधानी पटना या दोन शहरादरम्यान देशातील पहिली वंदे साधारण ट्रेन चालवली जाणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
मिडीया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर, भारतातील पहिली पुश पुल ट्रेन नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बिहारची राजधानी पाटणा आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई दरम्यान धावणार आहे. तथापि या मार्गावर ही गाडी चालवण्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडूनच घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
वास्तविक, पुश पुल ट्रेन ही एक अशी ट्रेन आहे ज्यामध्ये दोन इंजिन आहेत, एक समोर आणि दुसरे मागे. हे दोन्ही इंजिन एकाच वेळी ट्रेनला खेचतात आणि ढकलतात. ही गाडी तासी 130 किलोमीटर वेगाने धावणे सक्षम राहणार आहे. मात्र ही एक नॉन एसी गाडी राहणार आहे. तसेच या गाडीचे तिकीट दर वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा कमी राहणार आहे.
ही गाडी मुंबई ते पाटणदरम्यान सुरू झाली तर बिहारहुन महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. या गाडीमुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि किफायतशीर होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.