Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर दिवाळीचा सण आता फक्त बारा दिवसांवर येऊन ठेपला आहे. 12 नोव्हेंबर पासून यंदा दिवाळीचा सण सेलिब्रेट केला जाणार आहे. 12 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी सण साजरा होईल.
दरम्यान दिवाळीच्या सणाला राज्यातील विविध रेल्वे मार्गांवर प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता आता मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी हा निर्णय खूपच फायदेशीर ठरणार आहे.
मध्य रेल्वेने घेतलेले या नवीन निर्णयानुसार मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सणासुदीच्या काळात सहजतेने प्रवास करता येणार आहे. आता आपण या गाडीचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी चे वेळापत्रक
लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी ही एक्सप्रेस ट्रेन एक नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी शनिवारी, सोमवारी आणि बुधवारी एलटीटी येथून 22:15 वाजता सुटणार आहे चालवली जाणार आहे आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी दहा वाजता पोहोचणार आहे. तसेच थिवी ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही एक्सप्रेस ट्रेन दोन नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी थिविम येथून 15 वाजता सुटणार आहे.
या गाडीला या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी या महत्त्वाच्या स्थानकावर ही गाडी थांबा घेणार अशी माहिती समोर आली आहे.
एलटीटी- दानापूर गाडीचे वेळापत्रक कसे राहणार ?
एलटीटी- दानापूर ही गाडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. २८ ऑक्टोबर ते २ डिसेंबरपर्यंत ही गाडी चालवली जाईल. या कालावधीत ही गाडी शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटणार आहे. तसेच दानापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी २९ ऑक्टोबर ते ३ डिसेंबरपर्यंत चालवली जाणार आहे.
ही गाडी या कालावधीत दर रविवारी दानापूर येथून १८.३० वाजता सुटणार आहे. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, बक्सर, आरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.