रेल्वेचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील ‘या’ सहा रेल्वे स्टेशनवर आता प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही, कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ही बातमी राजधानी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण आणि दादर येथील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

कारण की मध्य रेल्वेने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता या संबंधित शहरांमधील रेल्वे स्टेशनवर काही ठराविक कालावधीसाठी प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध होणार नाही.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या संबंधित शहरातील स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने नुकताच घेतला आहे. मध्य रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिवाळी आणि छटपूजा निमित्त तसेच पुढल्या महिन्यात येणाऱ्या नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी पाहता आता रेल्वे स्टेशनवर नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान हीच वाढलेली गर्दी पाहता आणि गर्दीच्या नियंत्रणासाठी मध्य रेल्वेने फलाट अर्थातच प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंदीचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल येथील रेल्वे स्थानकावर आता काही ठराविक कालावधीसाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंदी केली जाणार आहे. त्यामुळे आता या स्टेशनवर प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही.

मध्य रेल्वेने कालपासून अर्थातच 16 नोव्हेंबर 2023 पासून ते 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत या संबंधित रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सीएसएमटी अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२.३० या वेळेत प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही.

दादर स्थानकावर सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२.३०, ठाणे रेल्वे स्टेशनवर सायंकाळी ७ ते मध्यरात्री १.३०, कल्याण रेल्वे स्थानकावर सायंकाळी ६ ते मध्यरात्री १.३०, एलटीटी अर्थातच लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई या रेल्वे स्थानकावर सायंकाळी ६.३० ते मध्यरात्री १.००, पनवेल रेल्वे स्टेशनवर रात्री ११.०० ते मध्यरात्री २.०० या वेळेत प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही. हा निर्णय 24 नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार असून याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन मध्ये रेल्वेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.