गुड न्यूज ! मुंबई सेंट्रल ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला ‘या’ रेल्वे स्थानकावर मिळाला थांबा, प्रवाशांना मिळाला मोठा दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : खानदेशमधून दररोज कामानिमित्त आणि पर्यटनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक राजधानी मुंबईत येत असतात. यामुळे या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते.

दरम्यान नववर्ष सुरू होण्यापूर्वीचं खानदेशमधून राजधानी मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे मुंबई सेंट्रल ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील एक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

मुंबई सेंट्रल ते भुसावळ एक्सप्रेस ट्रेन आता विरारला थांबणार आहे. खरेतर या मार्गावर आधीपासूनचं खानदेश एक्सप्रेस सुरू आहे. शिवाय या खानदेश एक्सप्रेसला विरार मध्ये थांबा देखील आहे.

पण ही खानदेश एक्सप्रेस आठवड्यातून फक्त तीनच दिवस चालवली जाते. त्यामुळे या मार्गावर मुंबई सेंट्रल ते भुसावळ दरम्यान एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली गेली पाहिजे अशी मागणी होती.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापूर्वी राजधानी मुंबई येथील मुंबई सेंट्रल ते भुसावळ दरम्यान एक्सप्रेस ट्रेन चालवण्यास मंजुरी देण्यात आली. तेव्हापासून ही गाडी धावत आहे. पण या गाडीला विरार मध्ये थांबा नव्हता.

त्यामुळे विरार मध्ये राहणाऱ्या खानदेश वासियांना या गाडीचा फारसा फायदा होत नव्हता. त्यामुळे विरार मधील रेल्वे प्रवाशांनी या गाडीला विरार या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला पाहिजे अशी मागणी केली होती.

आता रेल्वे प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाली आहे. मुंबई सेंट्रल ते भुसावळ या एक्सप्रेस ट्रेनला आता विरार मध्ये थांबा राहणार आहे. त्यामुळे निश्चितच या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

परिणामी, रेल्वे प्रवाशांनी सुद्धा रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. विरारमध्ये स्थायिक झालेल्या जळगाव, भुसावळ सहित संपूर्ण खानदेश मधील नागरिकांसाठी हा निर्णय खूपच फायदेशीर राहील असा विश्वास व्यक्त होत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा