Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी नॉर्थ महाराष्ट्र रिजन आणि विदर्भ रीजनमधील प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. खरेतर, सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. लग्नसराई आणि सणासुदीचा देखील हंगाम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर सध्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वेमध्ये होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे विभाग विविध मार्गांवर उन्हाळी विशेष गाड्या चालवत आहे.
यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे. आतापर्यंत विविध मार्गांवर अनेक उन्हाळी विशेष गाड्याची घोषणा झाली आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेने देखील नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार सुरत ते ब्रह्मपूर दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही गाडी राज्यातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे होत असलेली अतिरिक्त गर्दी या विशेष गाडीमुळे नियंत्रणात राहील असे पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून सांगितले जात आहे. दरम्यान, आता आपण या विशेष गाडीचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
पश्चिम रेल्वे कडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 09069 ही ट्रेन सुरत ते ब्रह्मपूर या दरम्यान स्पेशल गाडी म्हणून चालवली जाणार आहे. ही ट्रेन 17 एप्रिल ते 26 जून या कालावधीत चालवली जाईल.
या कालावधीत ही गाडी दर बुधवारी 14.20 वाजता सुरतहून निघेल आणि शुक्रवारी ब्रह्मपूरला सव्वा वाजता पोहोचणार आहे. तसेच गाडी क्रमांक 09070 ही ट्रेन ब्रह्मपूर ते सुरत यादरम्यान उन्हाळी विशेष गाडी म्हणून चालवली जाणार आहे.
ही स्पेशल गाडी 19 एप्रिल ते 28 जून 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी ब्रह्मपूरहून दर शुक्रवारी 03.30 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 13.45 वाजता सुरतला पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ?
पश्चिम रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, या विशेष गाडीला राज्यातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील आणि विदर्भातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
या ट्रेनला नंदुरबार, धरणगाव, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, बल्हारशाह, वारंगल, विजयवाडा, एलुरु, राजमुंद्री, समलकोट, दुव्वाडा, पेंदुर्ती, कोट्टावलासा, विजयनाग्राम, श्रीकाकुलम रोड आणि पलासा या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.