महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘या’ मार्गावर सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन; कसं राहणार वेळापत्रक, कोणत्या स्टेशनवर थांबणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी दिवाळीच्या काळात एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे.

कारण की, मध्य रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी कालपासून अर्थातच 13 नोव्हेंबर 2023 पासून सुरू करण्यात आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धुळ्या दरम्यान एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी या दोन्ही स्थानकादरम्यान रोजाना धावणार आहे. यामुळे धुळे ते मुंबई आणि मुंबई ते धुळे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

खरंतर धुळ्यासह संपूर्ण खानदेशातून राजधानी मुंबईत रोजाना कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. शिवाय मुंबईहून धुळ्याला आणि खानदेश मध्ये येणाऱ्यांची संख्या देखील कायमच उल्लेखनीय राहिली आहे.

हेच कारण आहे की या मार्गावर रोजाना एक्सप्रेस गाडी धावली पाहिजे अशी मागणी येथील प्रवाशांच्या माध्यमातून सातत्याने केली जात होती. यासाठी रेल्वे विभागाकडे मोठा पाठपुरावा देखील केला जात होता.

दरम्यान, हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून मुंबई ते धुळे या मार्गावर आता दैनंदिन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी कालपासून रेल्वे प्रवाशांसाठी सुरू झाली असून आता आपण या गाडीचे वेळापत्रक आणि या गाडीला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार वेळापत्रक?

रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून सुरू झालेली ही नवीन एक्सप्रेस ट्रेन रोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी बारा वाजता सुटणार आहे आणि धुळे येथे त्याच दिवशी रात्री २०.५५ वाजता पोहोचणार आहे.

तसेच या गाडीच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी धुळ्याहून दररोज सकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि मुंबईला त्याच दिवशी दुपारी १४.१५ वाजता पोहोचणार आहे. या गाडीमुळे खानदेशातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खानदेशची राजधानी मुंबईसोबत असलेली कनेक्टिव्हिटी यामुळे आणखी सुधारणार आहे.

कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ?

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे ते मुंबई दरम्यान धावणारी ही नवीन एक्सप्रेस ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामधा, शिरूड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवली जाणार आहे. यामुळे या परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.