मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारामधील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! 22 ऑक्टोबरपर्यंत ‘या’ रेल्वे गाड्या राहणार रद्द

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. परवापासून म्हणजेच 15 ऑक्टोबर पासून संपूर्ण देशात नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक रेल्वेने प्रवास करणार आहेत.

दरम्यान या सणासुदीच्या काळातच राज्यातील मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक चिंतेची बातमी समोर येत आहे. ही बातमी राजधानी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि सातारा मधील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक चिंतेची राहणार आहे. कारण की, पुणे विभागात काही तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार पुणे विभागातील पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील निरा ते लोणंद रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे 12 ते 21 ऑक्टोबर दरम्यानच्या काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे गाड्या या अंशता रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही गाड्या यामुळे उशिराने देखील धावणार आहेत.

यामुळे निश्चितच सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान या ब्लॉक कालावधीमध्ये रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाशी संबंधित काही तांत्रिक कामे केली जातील अशी माहिती रेल्वे प्रशासनाने यावेळी दिली आहे.

आता आपण या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या गाड्या रद्द राहतील, कोणत्या गाड्या अंशता रद्द राहतील आणि कोणत्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होईल याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कोणत्या गाड्या रद्द होतील

हाती आलेल्या माहितीनुसार, या ब्लॉकमुळे पुणे-फलटण, लोणंद – फलटण आणि पुणे – सातारा या डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी सुटणारी पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस फक्त कोल्हापूर ते सातारा दरम्यानच चालवली जाणार आहे.

22 ऑक्टोबर रोजी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी कोयना एक्सप्रेस मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्टेशन वरून सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी सुटणार आहे. म्हणजेच ही गाडी दोन तास उशिराने सुटेल.

याशिवाय कोल्हापूर ते मुंबई दरम्यान धावणारी कोयना एक्सप्रेस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सकाळी अडीच तास उशिराने म्हणजेच दहा वाजून 45 मिनिटांनी सुटणार आहे.

कोल्हापूर पुणे एक्सप्रेस देखील 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान उशिराने धावणार आहे.

त्यामुळे रेल्वे प्रवाशांना ब्लॉक कालावधीमध्ये थोडासा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. तथापि रेल्वे प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक आहे.