Maharashtra Railway News : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशाने नवरात्र उत्सवाचा पवित्र सण साजरा केला आहे. आता पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे. दिवाळीच्या काळात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
खरंतर भारतात रेल्वे हे प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे. सणासुदीच्या काळात तर रेल्वेमध्ये मोठी गर्दी होत असते. दिवाळीच्या काळात देखील रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. दरम्यान, दिवाळी सणाच्या पूर्वीच रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.
ही बातमी पुणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेसचा विस्तार केला जाणार आहे. पुणे-भुसावळ एक्सप्रेस ट्रेन आता अमरावती पर्यंत धावणार आहे. खरतर पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस ट्रेन नासिक, पनवेल, कर्जत मार्गे चालवली जात होती.
आता या गाडीचे ट्रान्सफॉर्मेशन केले जाणार आहे. म्हणजेच या गाडीचा आता मार्ग बदलण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे – भुसावळ – पुणे दैनंदिन हुतात्मा एक्स्प्रेसचा मार्ग बदलून भुसावळच्या पुढे अमरावतीपर्यंत विस्तारित केला जाणार आहे. ही गाडी आता बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
ही गाडी या रेल्वे स्थानकावर थांबे घेत अमरावती ते पुणे मग भुसावळला पोहोचेल. भुसावळ ते मनमाड दरम्यान नियमित थांबा घेऊन ही गाडी कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड मार्गे मनमाडहून पुण्याकडे धावणार आहे. एकंदरीत ही गाडी कमी अंतरात पुण्याला पोहोचेल, पण नाशिक, पनवेल मार्गे पुणे लिंकमुळे लोकल प्रवाशांची इच्छा धुळीस मिळत आहे विशेषत: नाशिक-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची इच्छा धुळीस मिळाली आहे.