महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! मुंबई आणि पुण्याहून धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द होणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि पुण्याहून धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या डिसेंबर महिन्यात रद्द केल्या जाणार आहेत. खरंतर भारतात प्रवासासाठी रेल्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. मुंबई आणि पुण्यातूनही दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.

यामुळे मुंबई आणि पुण्याहून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द राहणारा असल्याने रेल्वे प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

दोन ते 14 डिसेंबर दरम्यान धावणाऱ्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावरील जवळपास 48 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्याहून सुटणाऱ्या काही एक्सप्रेस चा देखील समावेश आहे.

या रेल्वे मार्गावरील राजनांदगाव आणि कन्हान दरम्यान थर्ड रेल्वे लाईनचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम दोन डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान सुरू राहणार आहे.

यामुळे या कालावधीत 48 एक्सप्रेस गाड्या रद्द राहणार आहेत. त्यामुळे काही काळ प्रवाशांना थोडासा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान आता आपण या नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे पुणे आणि मुंबईमधून धावणाऱ्या कोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द राहणार आहेत याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार प्रयत्न करणार आहोत.

या एक्सप्रेस गाड्या राहणार रद्द 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे हावडा – छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी टर्मिनस – हावडा एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल-पुरी एक्सप्रेस, पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस, हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल- हटिया एक्सप्रेस, संतरागाछी-पुणे एक्सप्रेस, पुणे-संतरागाछी एक्सप्रेस, विशाखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल-विशाखापट्टनम एक्सप्रेस या मुंबई आणि पुण्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.

मुंबई आणि पुण्यातून धावणाऱ्या या एक्सप्रेस गाड्या दोन ते 14 डिसेंबर या कालावधीत रद्द राहणार असल्याने प्रवाशांना यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा