महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; दिल्लीला जाणाऱ्या ‘या’ एक्सप्रेसला राज्यात चार नवीन थांबे, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी महाराष्ट्रातून दिल्लीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. खरतर राज्यातून दिल्लीला मोठ्या प्रमाणात प्रवासी जात असतात.

यामध्ये रेल्वे मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान आता मध्य रेल्वेने महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱ्या एका अति महत्त्वाच्या एक्सप्रेस ट्रेनला मध्य रेल्वेने चार नवीन थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्सप्रेस ट्रेनला महाराष्ट्रात चार नवीन थांबे मिळणार असल्याने महाराष्ट्रातील प्रवाशांचा दिल्लीकडील प्रवास सुखकर होणार आहे.

कोणत्या ट्रेनला मिळणार नवीन थांबे ?

मध्य रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार, महाराष्ट्रातून धावणाऱ्या मिरज ते हजरत निजामुद्दीन दरम्यानच्या धावणारी दर्शन एक्सप्रेसला नवीन चार थांबे देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दर्शन एक्सप्रेसला आता सांगली, कराड, सातारा आणि जेजुरी या चार नवीन रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.

विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच होणार आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे आता दर्शन एक्सप्रेसला मिरज, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सांगली, कराड, सातारा आणि जेजुरी या राज्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार आहे.

निश्चितच मध्य रेल्वेचा हा निर्णय पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा फायदेशीर राहणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांचा दिल्लीकडील प्रवास सोयीचा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दर्शन एक्सप्रेस दर रविवारी मिरज स्थानकावरून सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाकडे रवाना होते.

तसेच हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरुन ही गाडी शुक्रवारी मिरज रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना होते. खरंतर आतापर्यंत या दर्शन एक्सप्रेसला राज्यातील पाच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला होता. मात्र मध्य रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील एकूण नऊ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही एक्सप्रेस ट्रेन थांबणार आहे.