Maharashtra Railway News : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी खुशखबर आहे.
खरंतर दिवाळीच्या सणाला गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. दरम्यान गावी गेलेल्या नागरिकांना पुन्हा माघारी परतण्यासाठी देखील रेल्वेची व्यवस्था करून देण्यात आली आहे.
नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी देखील विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे विदर्भासहित नागपूरहुन मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वास्तविक नागपूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे.
मात्र या प्रवासी संख्येत गेल्या दोन आठवड्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या मार्गावर खूपच गर्दी होत आहे.
या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या हाउसफुल धावत आहेत. हेच कारण आहे की, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या माध्यमातून नागपूर ते मुंबई दरम्यान एकेरी विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
16 नोव्हेंबर 2023 रोजी अर्थातच उद्या ही गाडी सोडली जाणार आहे. उद्या रात्री दहा वाजता नागपुर येथून ही गाडी रवाना होणार आहे. तसेच ही गाडी दुसऱ्या दिवशी राजधानी मुंबईला पोहोचणार आहे.
16 तारखेला रात्री दहा वाजता नागपूर येथून ही विशेष एक्सप्रेस ट्रेन रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
विशेष बाब अशी की ही ट्रेन या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवली जाणार आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून ऐन सणासुदीच्या काळात रेल्वेने घेतलेला हा निर्णय या मार्गावरील नागरिकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष एक्सप्रेस ट्रेन वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर या महत्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबवली जाणार आहे.