दिवाळीच्या आधीच पुण्याला मिळाली मोठी भेट ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार स्पेशल ट्रेन, ‘त्या’ भागातील प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : येत्या महिन्याभरानंतर संपूर्ण देशभरात दिवाळीची धूम सुरू होणार आहे. तसेच सध्या संपूर्ण देशात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये आत्तापासूनच रेलचेल वाढली आहे. दरम्यान ही रेलचेल दिवाळीच्या काळात आणखी वाढणार आहे.

यामुळे रेल्वे प्रवाशांची देखील गर्दी वाढणार आहे. दिवाळीसाठी शहरात कामानिमित्त स्थायिक झालेले नागरिक मोठ्या प्रमाणात गावाकडे प्रस्थान करणार आहेत. यंदाच्या दिवाळी काळात दरवर्षीप्रमाणेच पुण्याहूनही गावी जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हीच शक्यता लक्षात घेता आता रेल्वे प्रशासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. पुण्याहून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. पुणे ते गोरखपुर दरम्यान ही स्पेशल गाडी चालवली जाणार आहे.

या विशेष एक्सप्रेस ट्रेनला महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. दरम्यान आता आपण या ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि या गाडीला कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

कस असेल या गाडीचे वेळापत्रक?

पुणे-गोरखपुर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. ही एक साप्ताहिक गाडी राहणार आहे जी की प्रत्येक शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून निघेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता उत्तर प्रदेश येथील गोरखपुर येथे पोहोचणार आहे.

तसेच गोरखपूर पुणे सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 21 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. ही साप्ताहिक गाडी प्रत्येक शनिवारी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी गोरखपूर रेल्वे स्थानकावरून आणि तिसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?

ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. पण महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकाबाबत विचार केला तर ही गाडी राज्यातील दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. त्यामुळे राज्यातील या भागातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा फायदा मिळू शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे.