दिवाळीत कांद्याचे भाव पुन्हा कमी होणार ! ‘या’ 2 कारणामुळे दरात होणार मोठी घसरण, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Onion Rate : नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपूर्ण भारताने टोमॅटोची झळाळी पाहिली आहे. टोमॅटोला गेल्या काही दिवसांपूर्वी विक्रमी भाव मिळत होता. देशातील विविध ठिकाणी किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर दोनशे रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले होते. तर काही ठिकाणी टोमॅटो 100 रुपये प्रति किलो पासून ते दीडशे रुपये प्रति किलो पर्यंत विकला जात होता.

टोमॅटोला किरकोळ बाजारात ऍव्हरेज 100 रुपयाचा भाव मिळाला होता. यामुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट बिघडले होते. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना या भाव वाढीचा निश्चितच फायदा मिळाला. पण सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील बजेट यामुळे पूर्णपणे बिघडले. मात्र आता टोमॅटोला कवडीमोल दर मिळत आहे.

यामुळे टोमॅटो उत्पादकांना आता टोमॅटो पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाहीये. अशातच आता कांद्याच्या बाजारभावात तेजी पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये हे भाव शंभर रुपये प्रति किलोपर्यंत जातील असा अंदाज आहे.

अनेक तज्ञांनी दिवाळीच्या काळात कांद्याला किरकोळ बाजारात शंभर रुपये प्रति किलो असा भाव मिळेल असे सांगितले होते. सध्या स्थितीला राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा सरासरी 3 हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या भावपातळीवर विकला जात आहे. काही बाजारात तर कांद्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळत आहे.

काही ठिकाणी कमाल बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला आहे. काल-परवा राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला तब्बल साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. याचाच अर्थ सध्या घाऊक बाजारात आणि किरकोळ बाजारात कांदा चांगलाच कडाडला असल्याचे चित्र आहे. पण यामुळे सर्वसामान्य नागरिक परेशान झाले आहेत.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट दिवसेंदिवस कोलमडत आहे. यामुळे आता किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्र शासनाने बफर स्टॉक मधील कांदा आता किरकोळ बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. बफर स्टॉक मधील कांदा पंचवीस रुपये प्रति किलो या भावात केंद्र शासनाकडून विक्री होणार आहे. केंद्र शासनाच्या ग्राहक विभागाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासोबतच केंद्राने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कांद्यावरील किमान निर्यातमूल्य ३१ डिसेंबरपर्यंत ८०० डॉलर प्रति टन करण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी हे दर 400 डॉलर प्रति टन असे करण्यात आले होते. पण आता यात वाढ करण्यात आली असून हे दर दुप्पट झाले आहेत. याचा परिणाम म्हणून भारतातील कांदा निर्यात 8% वरून थेट 2 टक्क्यावर येणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.

यामुळे साहजिकच कांद्याचे बाजारभाव कमी होतील असे मत व्यक्त होत आहे. जाणकार लोकांनी आगामी काही महिन्यात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने तसेच पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, शासनाच्या या निर्णयाचा कांदा बाजारभावावर किती विपरीत परिणाम होतो ? आणि दिवाळीच्या काळात खरंच कांद्याचे बाजारभाव कमी होतात का ? हे पाहण्यासारखे राहणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा