Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध घटकातील नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या योजना चालवल्या जात आहेत. राज्यातील महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, अपंग व्यक्तींसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून विविध योजना चालवल्या जात आहे.
या योजनेमध्ये विद्यार्थ्यांसाठी देखील काही कौतुकास्पद योजना राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत. यात अहिल्याबाई होळकर योजनेचा देखील समावेश होतो. या आईल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून राज्यातील काही विद्यार्थ्यांना मोफत पास पुरवले जात आहेत.
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास दिले जात आहेत. दरम्यान आज आपण या योजनेबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतो मोफत पास ?
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास दिले जात आहेत. पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना साध्या बस मधून प्रवास करण्यासाठी एसटीच्या तिकीट दरात शंभर टक्के सवलत दिली जात आहे. या योजनेअंतर्गत 100% प्रवासी भाड्यात सवलत मिळवण्यासाठी विद्यार्थिनींना पास पुरवले जात आहेत.
पास काढण्यासाठी कुठं जावं लागत ?
ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास दिले जात आहेत. या पासच्या माध्यमातून साध्या बसेस मधून प्रवास करता येतो. दरम्यान हा पास काढण्यासाठी संगमनेर तालुक्यातील विद्यार्थिनींना किंवा पालकांना बस स्थानकात जाण्याची देखील आवश्यकता नाही.
संगमनेर बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक संजय वाळके, रवींद्र दिघे, विलास चौधरी यांनी तालुक्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थिनींना मोफत पास उपलब्ध करून दिले आहेत.
संगमनेर तालुक्यातील इतक्या विद्यार्थिनींनी काढला मोफत पास
आतापर्यंत या योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील 2651 विद्यार्थिनींना मोफत पास देण्यात आला आहे. संगमनेर बस स्थानकाचे स्थानक प्रमुख गिरीश खेमनर, ज्ञानेश्वर मुरदारे यांनी ही माहिती दिली आहे. खरंतर गेल्यावर्षी तालुक्यातील 2034 विद्यार्थिनींनी पास काढला होता. यंदा मात्र पासची संख्या चांगलीच वाढली आहे.