महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होतोय देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू, दीड तासांचा प्रवास होणार फक्त 20 मिनिटात ! ‘असा’ राहणार मार्ग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : राज्यासह संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांपासून विविध विकास कामे केली जात आहेत. देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी शासन, प्रशासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत.

रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी वेगवेगळ्या शहरांदरम्यान नवीन रेल्वे मार्गांची निर्मिती केली जात आहे. सोबतच शहरांमधील प्रवास गतिमान व्हावा यासाठी मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरू केल्या जात आहे. शिवाय वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन देखील चालवल्या जात आहेत.

सोबतच आता वंदे साधारण ट्रेन, हाय स्पीड बुलेट ट्रेन देखील चालवली जाणार असून यासाठीची कामे देखील सुरू झाली आहेत. तसेच रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी समृद्धी महामार्गासारख्या मोठमोठ्या महामार्गांची देखील कामे पूर्ण केली जात आहेत.

मुंबई शहराचा विचार केला असता शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येथेही रस्ते विकासाची विविध कामे केली जात आहेत. सध्यास्थितीला राजधानी मुंबई सह उपनगरात रस्त्यांच्या विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहे. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो.

या प्रकल्प अंतर्गत देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू विकसित केला जात आहे. शिवडी ते नावाशेवा दरम्यान ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पअंतर्गत सागरी सेतू तयार केला जाणार असून या प्रकल्पाचे काम सध्या स्थितीला अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबईला जोडणार आहे.

या 21.8 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास गतिमान होणार आहे शिवाय यामुळे पुणे ते मुंबई हा प्रवास देखील जलद होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान याच प्रकल्पासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.

केव्हा सुरु होणार प्रकल्प

मुंबई ट्रांसफार्मर लिंक प्रकल्पाला श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्सफर लिंक प्रकल्प म्हणून ओळखले जाणार आहे. दिवंगत माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव या प्रकल्पाला देण्यात आले असल्याने या प्रकल्पाची ख्याती आणखीच वाढली आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित होत असलेला 21.8 किलोमीटर लांबीच्या सेतू पैकी 16 किलोमीटर लांबीचा भाग हा समुद्रावर आहे तर उर्वरित भाग हा जमिनीवर राहणार आहे.

या सागरी सेतूमुळे दीड तासाचा प्रवास फक्त वीस मिनिटात पूर्ण होईल असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. या पुलामुळे सेंट्रल मुंबईतील शिवरी येथून नवी मुंबईतील शिवाजीनगरला फक्त वीस मिनिटात पोहोचता येणार असल्याचा दावा केला जात आहे. सध्या स्थितीला हे अंतर पार करण्यासाठी जवळपास दीड तासांचा वेळ लागत आहे.

म्हणजेच या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई मधील नागरिकांचा एका तासाचा वेळ वाचणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, गोवा आणि बेंगलोर कडील अंतरही कमी होणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुणे, गोवा आणि बेंगलोरला जाणे आणखी सोपे होईल. हा प्रकल्प आता 25 डिसेंबर 2023 रोजी खुला होणार अशी माहिती समोर आली आहे.

तसेच हा सागरी सेतू सुरू झाल्यानंतर यावर 70,000 वाहने रोजाना धावतील असे सांगितलं जात आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून आतुरता लागून असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आता 25 डिसेंबरला सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात मुंबईकरांना एक मोठी भेट मिळणार असे बोलले जात आहे आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा