Maharashtra News : महाराष्ट्रात रेल्वे मार्गाने आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वसामान्य लोक नेहमीच एसटीने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. कारण की एसटीचा प्रवास हा खिशाला परवडणारा आहे.
शिवाय एसटी ही प्रत्येक मार्गावर सुरू आहे. यामुळे राज्यातील कोणत्याही शहरात प्रवास करायचा असेल तर एसटीलाच सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते. मात्र सध्या प्रवाशांच्या लाडक्या लाल परीने म्हणजेच एसटीने प्रवास करताना रोखीने तिकीट काढावे लागत आहे. अनेकदा तिकिटासाठी प्रवासी चिल्लर देतात यामुळे वाहकाला चिल्लर सांभाळताना अडचणीचे होते.
शिवाय सुट्ट्या पैशांमुळे अनेकदा वाहक म्हणजेच कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात वाद विवाद देखील होतात. कित्येकदा तर वादविवादाचे रूपांतर भांडणात देखील झाले आहे. मात्र आता एसटी मधील प्रवाशांना ऑनलाइन पेमेंट करूनही तिकीट काढता येणार आहे.
म्हणजेच आता एसटी प्रवाशांना गुगल पे तसेच फोन पे चा वापर करून एसटीचे तिकीट काढता येणार आहे. यामुळे वाहकांचा चिल्लर पैसे सांभाळण्याचा ताण बऱ्यापैकी कमी होणार आहे. शिवाय सुट्ट्या पैशांमुळे प्रवाशी आणि वाहक यांच्यात होणारे वाद-विवाद कायमचे निकाली निघणार आहेत.
निश्चितच राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतलेला हा निर्णय एसटी प्रवाशांसाठी आणि एसटी मधील वाहक कर्मचाऱ्यांसाठी देखील फायदेशीर राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता एसटी मधील वाहकांना तिकीट काढण्यासाठी नवीन अँड्रॉइड मशीन मिळणार आहे.
या नवीन मशीनमुळे आता ऑनलाइन पेमेंट करून म्हणजेच गुगल पे किंवा फोन पे ने पेमेंट करून तिकीट काढता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकाला आत्तापर्यंत 200 नवीन अँड्रॉइड मशीन वितरित करण्यात आली आहेत.
यापैकी चार मशीन्स संबंधित भागातील कंडक्टर यांना वितरित करण्यात आले आहेत. यामुळे आता एसटी मधील प्रवाशांना गुगल पे आणि फोन पे वापरून तिकीट काढता येणार आहे. तसेच आधीच्या मशीन्स मध्ये असणारा बॅटरीचा प्रॉब्लेम देखील यामुळे सॉल्व होणार आहे.
आधीच्या मशीनची बॅटरी म्हणजे चार्जिंग लवकर संपत होती त्यामुळे कंडक्टरला अनेकदा अडचण येत असे. पण आता या नवीन मशीन्समुळे ही अडचणhi दूर होणार आहे. अद्याप या मशीन्स मध्ये ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था नाही मात्र येत्या काही दिवसात ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था करून दिली जाणार आहे.